गृहमंत्र्यांनी न्याय द्यावा
मुंबई / प्रतिनिधी
केंद्र सरकार आणि राज्य सरकारने महिलांच्या तक्रारी गभिरतेने घ्याव्यात असे आदेश देवूनही माझ्या सारख्या फसवणूक झालेल्या महिलेला पोलिसांकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप शारदा ढोलपुरीया या महिलेने मुंबई मराठी पत्रकार पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
शारदा यांचे २०१० साली नरेश ढोलपुरीया या युवकाशी झाले. लग्न झाल्यापासून शारदा यांना आपल्या घरी नेण्यास नरेश टाळाटाळ करत होता. यामुळे शारदा यांनी नरेशच्या आई प्रेमलता यांच्याशी संपर्क केला असता नरेशचे लग्न झाले असून त्याला एक मुलगा आहे असे सांगून तू २ लाख रुपये घेवून गप्प बस अन्यथा तुझा जीव घेवू अशी धमकी दिल्याचे शारदा यांनी सांगितले. नरेशने माझी व माझ्या कुटुंबियांची फसवणूक केली असल्याचे उघड झाल्याने याबाबत तक्रार दाखल केली असता फक्त अदाखलपात्र गुन्हा म्हणून नोंद करण्यात आलेला आहे. नरेश याचे मामा लेकाराज जाजोरीया यांनी स्थानिक राजकीय पुढार्याना हाताशी धरून.पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप शारदा यांनी केला आहे.
नरेश याला विजा कन्सलटीचा व्यवसाय सुरु करण्यासाठी एक लाख रुपयांचे सहकार्य केले आहे. तसेच नरेश याने बँकेचे काढलेले कर्ज मी फेडले असल्याचे शारदा यांनी सांगितले. नरेश यांनी दुसरे लग्न केल्याचे माहित पडल्याने पोलीस स्थानकात जून २०१२ मध्ये तक्रार केली असता अद्याप न्याय मिळाला नसल्याचे शारदा यांनी सांगितले. सदर तक्रारीबाबत गृह मंत्री आर. आर. पाटील तसेच पोलीस आयुक्त सत्यपाल सिग यांना निवेदन दिले असून मला न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
No comments:
Post a Comment