विमान तिकीट एजंटांचा आंदोलनाचा इशारा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 March 2013

विमान तिकीट एजंटांचा आंदोलनाचा इशारा


मुंबई : प्रवासी आणि विमान तिकीट एजंट यांना मिळणार्‍या सोयीसुविधा, कमिशन आदी प्रकारे विमान कंपन्यांचा मनमानी कारभार सुरू असल्यामुळे सर्वसामान्य एजंटचे अस्तित्व टिकून राहणे अवघड झाले आहे. कमिशन न देणे, साप्ताहिक पेमेंटला विलंब करणे, भाड्यामध्ये असमानता, डायरेक्ट मार्केटिंग, कठोर वित्तीय हमीचा निकष आदी गोष्टींच्या विरोधात आयएटीए एजंट असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. सर्वसामान्य एजंट कायदेशीर ५ टक्के कमिशनपासून वंचित आहेत आणि प्रवाशांकडून ट्रान्झ्ॉक्शन फी घेण्यास त्यांच्यावर बंदी आहे. तिकीट विक्रीवरही १२.३३ टक्के सेवाकर आहे. कमिशन आणि ट्रान्झ्ॉक्शन फी नसेल तर एजन्सी बंद कराव्या लागतील, अशी भीती कायम राहिल्यास मोठी बेरोजगारी आणि १0 लाखांहून अधिक कर्मचारी आणि कुटुंबे उघड्यावर येतील, अशी भीती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. जी. हपेन, सरचिटणीस व्ही. एल. जगन्नाथन, राष्ट्रीय सचिव एस सालदान्हा यांनी प्रेस क्लब येथे गुरुवारी व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad