मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नागरी सत्कार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 February 2013

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा नागरी सत्कार


मुंबई : भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलची साडेबारा एकर जागा उपलब्ध करून देणार्‍या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मुंबई महानगरपालिकेकडून नागरी सत्कार करण्याची मागणी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी बुधवारी गटनेत्यांच्या बैठकीत केली. ही मागणी मंजूर झाली असून येत्या एपिल्र-मेच्या दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या हा सत्कार होणार आहे. ज्या मुंबईच्या भूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कारकीर्द बहरली त्याच मुंबईच्या भूमीवर त्यांचे भव्य असे स्मारक उभे राहणे ही लाखो मुंबईकरांच्या दृष्टीने अभिमानाची बाब असल्याचे निकम यांनी सांगितले.

पालिका विद्यार्थ्यांसाठी रमाई चित्रपट 
आज बुधवारी पालिका गटनेत्यांच्या बैठकीत बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी रमाई यांच्या जीवनावर आधारित रमाई हा चित्रपट पालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना दाखवावा असे ठरवण्यात आले आहे. यामुळे लवकरच पालिकेच्या सर्व विद्यार्थ्यांना रमाई हा चित्रपट शाळेमध्ये पहावयास मिळणार आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad