बंदसाठी चोख बंदोबस्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 February 2013

बंदसाठी चोख बंदोबस्त

मुंबई : बुधवारच्या 'भारत बंद'साठी मुंबई पोलिसांनी सुरक्षिततेचे व्यापक उपाय योजले आहेत. बंदनिमित्त शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून राज्य राखीव दलाच्या 20 तुकडय़ा, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सहा कंपन्या तसेच शीघ्र कृती दलाच्या चार तुकडय़ा शहराच्या विविध भागांत तैनात करण्यात आल्या आहेत. बंदला तोंड देण्यासाठी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी मंगळवारी सायंकाळी आपल्या कार्यालयात बडय़ा अधिकार्‍यांची एक बैठक घेतली. या बैठकीत 'बंद'निमित्त कोणती काळजी घ्यावयाची याची चर्चा झाली. शहर पोलिसांच्या मदतीला निमलष्करी जवानांच्या तुकडय़ा आणण्यात आल्या आहेत. 

दोन दिवसांच्या या औद्योगिक बंदला तोंड देण्यासाठी पोलिसांनी आपली यंत्रणा सज्ज ठेवली आहे. बस, रिक्षा व टॅक्सी यावर दगडफेक करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहे. शहरात जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. हमरस्त्यांवर पोलिसांची फिरती गस्त ठेवण्यात आली असून समाजकंटकाच्या धरपकडीला प्रारंभ झाला आहे. राज्यातील प्रमुख संघटनांचा या बंदला फारसा पाठिंबा नसल्याने हा बंद किती यशस्वी होईल, याबाबत पोलीस साशंक आहेत; पण खबरदारी म्हणून बंदोबस्त चोख ठेवणे हे पोलिसांचे काम असल्याने कोणताही धोका पत्करण्यास पोलीस तयार नाहीत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad