सुका व ओला कचरा वेगवेगळा न ठेवल्यास थेट तुरुंगाची हवा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 February 2013

सुका व ओला कचरा वेगवेगळा न ठेवल्यास थेट तुरुंगाची हवा

मुंबई : मुंबईकरांना यापुढे ओला आणि सुका कचरा वेगवेगळा ठेवण्यासाठी घरामध्ये दोन स्वतंर्त्य डबे ठेवावे लागणार आहेत. याची अंमलबजावणी न केल्यास पालिकेकडून फौजदारी कारवाई होऊन थेट तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. तुमच्यावर लक्ष ठेवण्यासाठी पालिका अधिकारी कार्यरत राहणार असून तसे परिपत्रक पालिकेकडून जाहीर केले गेले आहे.

पालिकेच्या घनकचरा विभागाचे प्रमुख प्रकाश कदम यांनी 2 फेब्रुवारी रोजी काढलेल्या एका परिपत्रकाद्वारे कारवाईचे आदेश दिले आहेत. पालिका घनकचरा नियम 2000 नुसार घरोघरी जाऊन कचरा संकटित करणे व त्याचे वर्गीकरण करणे पालिकेचे बंधनकारक कर्तव्य असल्याचे परिपत्रकात म्हटले आहे. घनकचरा विभागातील सहाय्यक अभियंता आणि सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक यांच्यावर कचरा निर्मूलनाची ही जबाबदारी सोपवण्यात आली असून मुंबईला 100 टक्के कचरा मुक्त करण्यासाठी टप्प्याटप्प्यांनी सुलभ पातळीवर नियोजन करण्यात येत आहे. माहिती अधिकारात आरटीआय कार्यकर्ते शरद यादव यांना दिलेल्या माहितीत ही माहिती देण्यात आली आहे. ओला व सुका कचरा वेगवेगळा न ठेवता एकत्र ठेवल्यास घरमालकास दंड आकारण्यात येईल किंवा एक महिन्याची आगावू नोटीस देऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

..तर अधिकार्‍यांवर कारवाई प्रत्येक घराघरांतून 100 टक्के कचरा संकलित करून त्याचे ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करून मुंबईला कचरामुक्त करण्याची जबाबदारी घनकचरा व्यवस्थापन खात्यातील सहाय्यक अभियंता व सहाय्यक मुख्य पर्यवेक्षक यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्यांच्याकडून ही जबाबदारी पार पडताना हयगय झाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. या कारवाईचे सर्व अधिकार परिमंडळीय कार्यकारी अभियंता (पर्यावरण) यांना देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad