मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले यांच्या अध्यक्षतेखाली संघाच्या कार्यकारिणीतील पदाधिकार्यांनी शिवसेना भवनात उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. संघाचे विश्वस्त भारतकुमार राऊत, विजयकुमार बांदल, सदानंद खोपकर, प्रमोद तेंडुलकर, प्रभाकर राणे, नंदा परब, वंदना खापरकर आदींचा यात समावेश होता. या वेळी अनौपचारिक गप्पा मारताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनाप्रमुखांनी काढलेली व्यंगचित्रे, छायाचित्रे, त्यांची भाषणे, त्यांच्यावरील समग्र साहित्याची नव्या पिढीला माहिती व्हावी यासाठी हे सर्व प्रदर्शित करणारे एक भव्य दालन असावे, अशी आपली इच्छा आहे.
मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे शिवाजी पार्कमध्येच स्मारक व्हावे, असा आपला आग्रह नाही, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या नेत्यांनी वेगवेगळय़ा विषयांच्या माध्यमातून फुलटॉस दिले आणि ते टोलविण्यात आम्ही कमी पडलो नाही. पुढेही कमी पडणार नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच काढलेल्या महामोर्चाच्या यशस्वीतेचे कौतुक केले. कामगारांची स्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळेच आजच्या कामगारांच्या बंदमध्ये आमच्या संघटनाही सहभागी होत आहेत, असे ते म्हणाले. पत्रकार संघाचे अध्यक्ष मटाले यांनी त्यांना पत्रकार भवनाच्या नूतनीकरणाच्या संकल्पचित्राचे सादरीकरण दाखविले. उद्धव ठाकरे यांना संघाचे मानद सभासदत्वही या वेळी देण्यात आले. खासदार संजय राऊत, मनोहर जोशी या वेळी उपस्थित होते
No comments:
Post a Comment