मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिकेच्यावतीने सालाबाद प्रमाणे पालिका प्रशासन, पदाधिकारी ( नगरसेवक ) व पालिकेचे वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांमध्ये क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रिकेट सामन्यांमध्ये पालिका वार्ताहर संघाच्या कार्यकारणी मधील पदाधिकाऱ्यानीच खेळायचे याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी आज बुधवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी एका खास मिटिंगचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एका पदाधिकाऱ्याने आपले नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली आहे.
सदर मिटिंग मध्ये मागील वर्षी जसे पालिकेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना क्रिकेट सामन्यांबाबत कोणतीही माहिती न देता वार्ताहर संघाचे पदाधिकारी क्रिकेट सामने खेळून आले तशीच रणनीती आखून पुन्हा पत्रकारांना अंधारात ठेवून पदाधिकाऱ्यानीच क्रिकेटचे सामने खेळावे या निर्णयावर शिक्कामोर्तब केले जाणार असल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले. पालिकेचे वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांना या सामान्यामध्ये सहभागी होता येवू नये म्हणून मागील वर्षी क्रिकेट सामन्यांबाबत माहिती देणारे पत्र नोटीस बोर्ड वर लावले गेले नाही असाच प्रकार यावेळीही करणार असल्याची माहिती सदर पदाधिकारयाने उघड केली आहे.
सदर पदाधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार पालिकेच्या स्थायी समितीकडून क्रिकेटचे सामने खेळण्यासाठी पत्रकारांना ३ हजार रुपयांचे बूट आणि कपडे दिले जातात. फुकटचे हजारो रुपयांचे मिळणारे कपडे आणि बूट स्वतालाच मिळावे यासाठी वार्ताहर संघाचे पदाधिकारी असलेल्या पत्रकारांकडून असे प्रकार केले जात असून ज्यांना धावताही येत नव्हते त्यांची नावे २०१२ मध्ये क्रिकेट सामने खेळण्यासाठी दिली होती. विशेष म्हणजे ज्या पत्रकारांनी बूट आणि कपड्यांसाठी मागील वर्षी पैसे घेतले त्यापैकी कित्येक पदाधिकारी असलेल्या पत्रकारांना २०११ मध्ये क्रिकेटचे सामने झाले नसतानाही बूट आणि कपड्यांसाठी स्थायी समितीने पैसे दिल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले.
पालिका वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्यानी इतर पत्रकारांपासून लपून बंद दरवाजाच्या आत जशी आपली कार्यकारणी निवडली तश्याच प्रकारे क्रिकेट सामन्यांसाठी संघ निवडणार कि आपल्या कारभारात पारदर्शकता आणून सर्व पत्रकारांना विश्वासात घेवून खरोखर क्रिकेट खेळतात अशा पत्रकारांना क्रिकेट संघामध्ये सामावून घेणार याकडे पालिकेचे वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान पालिकेत वृत्त संकलन करणाऱ्या पत्रकारांनी पालिका वार्ताहर संघाच्या पदाधिकाऱ्याना फुकट मिळणारे कपडे व बूट हवे असल्यास त्यांनी खुशाल ठेवावेत पण यावर्षी तरुण व खरोखरच क्रिकेट खेळणाऱ्या पत्रकारांना सामन्यांमध्ये खेळण्याची संधी द्यावी अशी मागणी केली आहे.
Post Top Ad
27 February 2013
Home
Unlabelled
पालिकेत पुन्हा पत्रकारांच्या क्रिकेटचा सामना
पालिकेत पुन्हा पत्रकारांच्या क्रिकेटचा सामना
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment