मुंबई : महाराष्ट्र आदिवासी महादेव कोळी संघटना, पुणे यांच्या वतीने मंगळवारी विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात आले. मल्हार कोळी, टोकारे कोळी, मन्ने खारलू समाज संघटन, पुणे शाखेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले होते. रक्त नातेवाईकांच्या कुटुंबात वैधता प्रमाणपत्र मिळालेल्या पुन्हा पोलीस दक्षता पथकामार्फत चौकशी न करता वैधता प्रमाणपत्र देण्यात यावे, अँध, भिल्ल, गौंड यांना ज्याप्रमाणे पोलीस दक्षता पथकामार्फत गृहचौकशी न करता वैधता प्रमाणपत्र दिले जाते, तोच न्याय महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकारे कोळी, मन्नेर वारलू जमातीला असावा, अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र काढताना इ.स. १९५0 चा पुरावा मागण्यात येऊ नये आदी मागण्या शिनगारे यांनी केली.
Post Top Ad
27 February 2013
Home
Unlabelled
आदिवासी महादेव कोळी संघटनेचे आंदोलन
आदिवासी महादेव कोळी संघटनेचे आंदोलन
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment