मुंबई / अजेयकुमार जाधव
हैदराबाद येथे झालेल्या बॉम्बस्फोटा नंतर मक्का मदिना बॉम्बस्फोट प्रकरणी कोणताही पुरावा मिळाला नाही म्हणून सोडून दिलेल्या मुस्लिम तरुणांना चौकशी साठी बोलावले जाते मग मालेगाव बॉम्बस्फोटा नंतर शहीद हेमंत करकरे यांनी चार्ज शिट मध्ये उल्लेख केलेल्या ५०० हिंदू आतंकवाद्याना चौकशी साठी का बोलावले जात नाही असा प्रश्न समाजवादी पक्षाचे अबू आझमी तपास यंत्रणाना केला.
पत्रकार परिषदेत बोलताना ५०० हिंदू आतंकवादी आता कुठे आहेत याचा शोध तपास यंत्रणा का नाहीत असा प्रश्न विचारून बॉम्बस्फोट झाले कि फक्त मुस्लिम तरुणांना चौकशीच्या नावावर कित्तेक वर्षे तुरुंगात ठेवले जाते व कोणतेही पुरावे मिळणे नाही कि मग सोडून दिले जाते. मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचे हे षड्यंत्र असल्याचा आरोप आझमी यांनी केला. तपास यंत्रणांना भटकळने बॉम्बस्फोट केले हे माहित तर मग तपास करण्यात काही अर्थ नसून भटकळला ताबडतोब अटक करून फासावर लटकवा अशी मागणी आझमी यांनी केली.
यावेळी मनसे कडून परीक्षा देणाऱ्या स्थानिक उमेदवारांवर हल्ले केले जात आहेत हे सरकारला माहित असले तरी शिवसेना आणि मनसे मध्ये मराठी मतांची विभागणी व्हावी म्हणून काँग्रेस गप्प बसून तमाशा बघत आहे. यामुळे येत्या निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि बिहार प्रमाणे काँग्रेसला सत्ते बाहेर राहावे लागणार आहे त्यासाठी आपण प्रयत्न करू असे आझमी यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment