महिला आणि बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांची विशेष उपस्थिती
मुंबई / केतन खेडेकर कुलाबा येथिल वुमन ग्रजूएट युनियनच्या वतीने महिलांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यास विभागातील असंख्य महिलांनी मेळाव्याला उपस्थित राहून महिलांना मार्गदर्शन केले.
' जीवन म्हणजे काय' ,मायेचा ओलावा काय असतो, आपण भविष्यात काय बनू शकतो , अशा अनेक अधांतरी प्रश्नांच्या उत्तरांची वाट पाहत असलेल्या वाशी, देवनार, धारावी , गोवंडी, मानखुर्द या दुर्गम भागातील अनाथ आश्रमातील मुलांना तुम्ही जमेल तेवढी मदत करण्याचा प्रयत्न करा .या मुलांना आपले आई वडील कोण आहेत , कोण होते हे माहित नाही. त्यामुळे ती मुले निरागस, दु:खी झालेली आहेत. त्यांच्यात जगण्याची इच्छाच राहीलेली नाही.
तुमच्या सारख्यां महिलांनी त्या दुर्गम भागात जाऊन त्यांच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवा , त्यांचाशी बोलून त्यांचे मन मोकळे करा . त्यांना जीवन जगण्यास प्रवृत्त करा . आपल्याला आई वडील नसले तरी त्याहीपेक्षा कुणीतरी मोठे आहेत असे त्यांना वाटू दया . आज ना उद्या आपणही शिकून काहीतरी ,कुणीतरी चांगले बनू शकतो . अशी ज्योत तुम्ही त्यांच्या मनात पेटवू शकता . असे आव्हान महिला आणि बालविकास मंत्री वर्षा गायकवाड यांनी उपस्थित महिलांना आपल्या भाषणातून केले.
अनाथ मुलांच्या समस्या सोडवण्यासाठी आमची संस्था नेहमीच पुढाकार घेत असते. अनाथ मुलांना आमच्या संस्थेकडून शैषणिक साहित्याचे वाटप केले जाते.त्यांच्या कलागुणाना वाव देण्यासाठी आम्ही चित्रकला स्पर्धेसारखे अनेक शैषणिक कार्यक्रम राबवत असतो. यापुढे हि आम्ही अशाच प्रकारे सामाजिक आणि शैषणिक कार्यक्रमाचे आयोजन करणार आहोत. वर्षा गायकवाड यांनी केलेल्या सुचानाबद्दल आम्ही नक्कीच गंभीर विचार करणार आहोत.
महिला ग्रजूएट युनियनच्या अध्यक्षा श्रीमती गौरी छाब्रिया यांनी वर्षा गायकवाड यांचे विशेष आभार मानले .त्यानंतर महिला ग्रजूएट युनियनच्या नवीन सभागृहाचे उद्घाटन वर्षा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला विभागातील असंख्य महिला, लहान मुले आणि महिला लेखिका प्रमिला जाधव उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment