‘नगरसेवक’ अशी अक्षरे असलेले आणि त्यावर पालिकेचे बोधचिन्ह असलेले स्टिकर नगरसेवकांना गाडीवर लावण्यासाठी दिले जाते. मात्र नगरसेवकांऐवजी अन्य लोकच त्या गाड्यांचा सर्रास वापर करतात. याबाबतच्या तक्रारी स्वयंसेवी संस्थांनी महापौर सुनील प्रभू यांच्याकडे केल्या. त्याची गंभीर दखल घेऊन प्रभू यांनी पोलीस आयुक्तांना पत्र लिहून नगरसेवकांच्या स्टिकरचा गैरवापर करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. नगरसेवकांनी दिलेल्या स्टिकरचा गैरवापर होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.
ज्या नगरसेवकांना लोगो दिले त्यांच्या गाड्यांचे नंबर घेऊन ही यादी पोलीस आयुक्त आणि आरटीओ आयुक्तांना देण्यात येईल. या यादीतील गाड्यांव्यतिरिक्त इतरांनी लोगो किंवा बनावट फोटो वापरल्यास त्यांच्यावर कारवाईची मागणी केली जाईल, असे अतिरिक्त आयुक्त मोहन अडतानी म्हणाले.
No comments:
Post a Comment