पाणी येईल तेव्हाच आंदोलन थांबवणार - देशमुख - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 February 2013

पाणी येईल तेव्हाच आंदोलन थांबवणार - देशमुख

मुंबई : गेल्या १८ दिवसांपासून आम्ही पिण्याच्या पाण्यासाठी आंदोलन करीत आहोत. गावाकडून आमच्या खात्रीच्या माणसाकडून जोपर्यंत 'पाणी सोडले' असा फोन येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहोत, असा इशारा देतानाच सोलापूर जिल्ह्यातील जनतेच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला असताना मुख्यमंत्री लेखी हमी मागून आम्हा शेतकर्‍यांची चेष्टाच करीत आहेत, असा आरोप करून सोलापूर जिल्हा जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर ऊर्फ दिनकर (भय्या) देशमुख यांनी दिला.

शेतीसाठी नाही तर पिण्यासाठी पाणी वापरणार असाल तरच उजनी धरणाचे पाणी डाव्या व उजव्या कालव्यात सोडून सोलापूरच्या जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढू, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले असून त्यावर या संघटनेने गुरुवारी मुख्यमंत्र्यांना लेखी निवेदन दिले आहे. 
सोलापूर जिल्ह्यातील दारिद्रय़- रेषेखालील जनतेची यादी शासनाने त्वरित प्रसिद्ध करावी. बागायतदार, व्यापारी आदी प्रकारची श्रीमंत मंडळी दारिद्रय़रेषेखालील यादीत आहेत. त्यामुळे यादी प्रसिद्ध झाल्यावर माहितीच्या अधिकाराखाली मिळालेली माहिती व सरकारने दिलेली माहिती याचा ताळमेळ घालत बोगस दरिद्री बाहेर येतील व खर्‍या दरिद्री माणसाला सरकारी योजनेचा लाभ होईल, अशी मागणी करीत भय्या देशमुख यांनी या प्रश्नावर पाण्याच्या आंदोलनानंतर तीव्र लढा देण्याचा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad