नवीन भांडवली मूल्याधारित मालमत्ता करप्रणालीत सावळा गोंधळ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 February 2013

नवीन भांडवली मूल्याधारित मालमत्ता करप्रणालीत सावळा गोंधळ


मुंबई : मुंबई महानगरपालिकेने 1 एपिल्र 2010 पासून भांडवली मूल्याधारित मालमत्ता करपद्धती पूर्वलक्षी प्रभावाने लागू केली आहे. या पद्धतीनुसार 15 जानेवारी 2010 पासून देण्यात आलेल्या बिलांमध्ये मोठय़ा प्रमाणात सावळा गोंधळ असून 33 हजार 400 करदात्यांना अद्यापि ही देयकेच मिळालेली नाहीत. यामुळे 3360 करदात्यांनी पालिकेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत, मात्र यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा यांच्याकडून शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला गेला. नवीन भांडवली मूल्याधारित मालमत्ता करप्रणाली चांगली व पारदर्शक असल्याचे सांगत जलोटा यांनी ज्या करदात्यांना देयकामध्ये जास्त रक्कम दर्शवली असेल तर पुन्हा रिफंड फॉर्म भरल्यानंतर तीन महिन्यांत परत करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ज्या 33 हजार 400 करदात्यांना देयके मिळाली नाहीत, त्यांना 15 फेब्रुवारीपर्यंत तीन वर्षाचे देयके दिले जाईल, मात्र देयके भरण्याची शेवटची मुदत 31 मार्चपर्यंत असेल, असे जलोटा यांनी सांगितले. तक्रारदारांमध्ये शहरातील 2854, पूर्व उपनगरातील 98 व पश्चिम उपनगरातील 408 अशा प्रकारे 3360 करदात्यांनी तक्रारी केल्या आहेत. या नवीन करप्रणालीमुळे 19 टक्के निवासी, तर 60 टक्के व्यावसायिक दुकानदारांना आर्थिक भार पडणार आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad