मुंबई : दलित-आदिवासी यांच्यावर दिवसेंदिवस अत्याचार वाढत असून सरकारने ते वेळीच रोखले नाही तर आम्हाला हा लढा तीव्र करावा लागेल, अशा आशयाचा इशारा देत रिपाइंचे कांदिवली (पूर्व) तालुक्याच्या वतीने समता नगर पोलीस ठाण्यावर नुकतेच धरणे आंदोलन करण्यात आले.
सहाय्यक पोलीस आयुक्त प्रवीण तिवारी व व.पो.नि. नानासाहेब कांबळे यांना रिपब्लिकन पदाधिकार्यांनी निवेदन देऊन दलित-आदिवासींवर अत्याचार करणार्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. या आंदोलनात रिपाइंचे मुंबई उपाध्यक्ष संजय सकपाळ, उत्तर मुंबईचे अतिरिक्त महासचिव श्रीराम खडसे, तालुकाध्यक्ष मधुकर भोरे, उपाध्यक्ष राजेंद्र सोहनी, वॉर्ड अध्यक्ष शाहू काळे, गुरू खैरनार, हरिबा कोंडे, सुधीर थोरात, सयाजी उघडे, रवी सरवदे, सुरेश कीर्तीकुडाव, अभय मोरे, मंगेश बोबडे, प्रभाकर बोबडे, झहीर खान, प्रल्हाद मिसाळ, कल्पना काळे, भारताबाई काळे, रंजना गवई आदी कार्यकर्त्यांनी भाग घेतला. दरम्यान, रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार हे आंदोलन झाले. २00९ पर्यंतच्या झोपडीधारकांना कायम करावे व त्यांना एसआरएअंतर्गत २६९ ऐवजी ५५0 चौ. फूटाचे घर द्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी लावून धरली होती
No comments:
Post a Comment