सन २०१२ - २०१३ च्या अर्थसंकल्पात पाणीपट्टी ८ टक्क्याने तर सेवाकर १० टक्क्याने वाढवण्यात आला होता. अर्थसंकल्पात पाणीपट्टी मध्ये वाढ केल्याने मुंबईकर नागरिकांना १ हजार लिटर मागे १.२५ रुपयांची वाढ करण्यात आली होती, हौसिंग सोसायटीला १ हजार लिटर मागे ५० पैसे वाढ करण्यात आली होती. पालिकेला पाणीपट्टी द्वारे ८१६.४१ कोटी रुपयांचा महसूल मिळत होता परंतु पाणीपट्टी मध्ये वाढ केल्याने पलिकेअल ११२९.८१ कोटी रुपयांचा महसुल मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
सन २०१२ -२०१३ च्या अर्थसंकल्पात जुन्याच कामाना प्राधान्य देताना व्यवसाय कचरा निर्मुलन आकारासाठी परवाना शुल्कामध्ये ७५ टक्के, नागरिकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा शुल्कात १० टक्के, व्यापाऱ्यांच्या परवाना शुल्कात ७५ टक्के वाढ करण्यात आली होती. या अर्थसंकल्पात शिक्षणासाठी २३४२ कोटी, आरोग्यासाठी २३४५ कोटी, रस्त्यांसाठी २४६६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
सन २०१३-२०१४ च्या अर्थसंकल्पात गेल्या वर्षी पेक्षा वाढ करण्यात आली असून आज सादर होणारा अर्थसंकल्प २८ हजार कोटी रुपयांचा असणार आहे. सन २०१२ -२०१३ च्या अर्थसंकल्पात पाणीपट्टीमध्ये तसेच विविध सेवाशुल्कासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्कामध्ये वाढ केल्या नंतर आज सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात पालिका आयुक्त मुंबईकर नागरिकांवर आणखी किती शुल्क वाढवणार कि कमी करणार याकडे मुंबईकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.
एकीकडे संपूर्ण मुंबईकरांचे लक्ष पालिकेच्या अर्थसंकल्पावर लागले असतानाच पालिकेमध्ये मागासवर्गीयांची १९ हजार पदे रिक्त आहेत. मागासवर्गीयांची हि पदे सत्ताधारी आणि प्रशासनातील जातीवादी अधिकारी यांच्या मुले वर्षानुवर्षे भरली गेली नाहीत. रिक्त पदे भरण्यासाठी बजेट मध्ये तरतूद करण्याची आवश्यकता असते अशी तरतूद पालिकेच्या बजेट मध्ये अद्याप केली जात नसल्याने मागासवर्गीयांची १९ हजार पदे अद्याप भरली गेली नाहीत. मुंबई महानगर पालिकेत बहुसंख्य मागासवर्गीय कर्मचारी असल्याने पालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी मागासवर्गीयांची १९ हजार रिक्त पदे भरण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.
नागरीक आधीच झालेल्या भाववाढीमुळे त्रस्त झाले असताना केंद्र सरकार चालवणाऱ्या काँग्रेस आघाडीच्या विरोधात असलेल्या शिवसेना भाजपची सत्ता असलेल्या मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प सादर करताना मुंबईकर नागरिकांना दिलासा मिळणार कि आधीच भाववाढीच्या ओझ्याखाली दबलेल्या नागरिकांना शिवसेना भाजपही भाववाढीच्या ओझ्याखाली अधिक दाबून टाकणार का, मुंबईकर नागरिकांना चांगले खड्डे मुक्त रस्ते, विभागामध्ये स्वच्छता, वेळेवर व स्वच्छ पाणी पालिका उपलब्ध करून देणार का असे कित्तेक प्रश्न मुंबईकर नागरिकांकडून उपस्थित केले जात आहे.
अजेयकुमार जाधव
मो. ०९९६९१९१३६३
No comments:
Post a Comment