पालिकेच्या सन २0१३-१४ च्या अर्थसंकल्पावर गेल्या शुक्रवारपासून स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्या भाषणाने चर्चेला सुरुवात झाली होती. सोमवारीही काही नगरसेवकांनी आपली मते मांडली. मंगळवारी काही प्रमुख गटनेते आपली भाषणे करणार होती. तसेच मंगळवारी अर्थसंकल्पाला मंजुरी देणे ठरले होते. स्थायी समितीत अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर ७ मार्चला पालिका सभागृहात मांडला जाणार होता.
मंगळवारी दुपारी ३ वाजता स्थायी समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती, मात्र ५ वाजले तरी स्थायी समिती अध्यक्ष तसेच प्रशासनाचे अधिकारीही आले नसल्याने विरोधी पक्षात बसलेले मनसेचे गटनेते दिलीप लांडे, राष्ट्रवादीचे गटनेते धनंजय पिसाळ तसेच नगरसेवक प्रवीण छेडा यांच्यासह इतर विरोधी पक्ष नगरसेवकांनी सभेवर बहिष्कार टाकत निघून जाणे पसंत केले. त्यानंतर अध्र्या तासाने साडेपाचच्या दरम्यान, अध्यक्ष राहुल शेवाळे सभागृहात आले आणि त्यांनी सभेला सुरुवात केली.
No comments:
Post a Comment