मुंबईतील रस्त्यांसाठी ६२२ कोटी मंजूर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 February 2013

मुंबईतील रस्त्यांसाठी ६२२ कोटी मंजूर


मुंबई : मुंबईतील खड्डेमय रस्त्यांमुळे होणार्‍या त्रासापासून मुंबईकरांची लवकरच सुटका होणार आहे. पालिका प्रशासनाने मुंबईतील रस्त्यांसाठी ६२२ कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून मुंबईतील एकूण १३५ रस्त्यांची कामे होणार आहेत. 

या प्रस्तावावर बोलताना भाजपा गटनेते दिलीप पटेल यांनी रस्त्यांखालील असलेल्या युटिलिटीजचा प्रथम उपाय योजावा, अशी मागणी करत हा प्रस्ताव राखून ठेवण्याची मागणी केली, मात्र स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी भाजपाच्या या मागणीकडे दुर्लक्ष करत हा प्रस्ताव मंजूर केला. मुंबईतील नागरिकांना चांगल्या दर्जाचे रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेने १४00 कोटी खर्च करण्याची योजना तयार केली आहे. पालिका प्रशासनाने मुंबई शहरातील १३५ रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी ६२२ कोटींची तरतूद केलेल्या प्रस्तावाला सोमवारी स्थायी समितीत मंजुरी दिली.

मुंबई शहरातील १३५ रस्त्यांपैकी १0३ रस्त्यांचे डांबरीकरण होणार असून ३२ रस्त्यांचे सिमेंटीकरण करण्यात येणार आहे, मात्र पालिकेकडून ही रस्त्यांची कामे देताना ज्या कंत्राटदारावर निकृष्ट कामाचे आरोप केले गेले होते, त्याच आर. पी. शाहलाही यामध्ये कंत्राट देण्यात आले आहे. या वेळी मनसेकडून कंत्राटदारांबरोबर हातमिळवणी असल्याचा आरोप केला गेला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad