मुंबई : मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनीवरील, पीएमजीपीच्या पुनर्विकासातून, एलआयसीच्या इमारतीमधून, आदी प्रकारे पुनर्विकास करत मुंबईत घरे निर्माण करून भूमिपुत्रांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावणार. सामन्य माणसाला म्हाडा कार्यालयात येताना दलालांची व भ्रष्ट अधिकार्यांची भीती वाटू नये म्हणून मी माझा सामान्य नागरिकांसाठी प्लॅन तयार करत आहे. वेळ पडल्यास घुसखोर व दलालांना वेगळ्य़ा स्टाईलने उत्तर देणार, असे सांगत मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ सभापती प्रसाद लाड यांनी यापुढे म्हाडाच्या लॉटरीमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे सांगितले.
7 महिन्यांपूर्वी या पदावर आलेल्या लाड यांनी धडक कृती कार्यक्रम राबवत, फाईलींचे स्कॅ निंग करत, म्हाडा म्हणजे रावणाची लंका हा शिक्का पुसण्याचा प्रयत्न केला आहे. सामान्य नागरिकांनी अद्याप माझ्यापर्यंत एकही तक्रार केली नाही. असे सांगत लाड म्हणाले, धोकादायक इमारतींचा प्रश्न गंभीर आहे. दोन-दोन पिढय़ांपर्यंत संक्रमण शिबिरात लोक राहात आहेत. त्यांना अद्याप आपण घर देऊ शकलो नाही. ही खेदाची बाब आहे. आतापर्यंत 2200 फायलींचे स्कॅनिंग केले आहे. त्यामुळे भ्रष्टाचार बाहेर येण्यास मदत होणार आहे.
गुगलच्या माध्यमातून एका क्लिकवर म्हाडाचा कारभार आदी करतोय. गुगलच्या माध्यमातून त्या इमारतीचा नकाशा रोड, सिटी सर्वे नंबर, सेझ किती भरला किती बाकी आहे, किती वेळा इमारत दुरुस्ती झाली, आदी माहिती मिळणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात म्हाडाचा कारभार हायटेक करणार आहे. 31 मार्चपर्यंत हा हायटेक कारभार पूर्ण होईल. राजकीय पक्षांनी एकत्र येऊन राजकारणाऐवजी समाजकारण करत रहिवाशांचे प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.
पीएमजीपी वसाहतीच्या बाबतीत मुख्यमंर्त्यांचा निर्णय लवकरच अपेक्षित आहे. 7 ते 8 हजार घुसघोरांना मी माझ्या स्टाईलने पोलिसांच्या मदतीने योग्य धडा शिकवत आहे व शिकवत राहणार. मुंबई मंडळ व दुरुस्ती मंडळ यांचा समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करणार, असे लाड यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment