मुंबई : महाराष्ट्रातील शिवकालीन गड-किल्ल्यांचे संवर्धन आणि अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या मागणीसाठी सह्याद्री प्रतिष्ठान आणि मराठा युवक संघटनेने २८ फेब्रुवारी रोजी माहिम किल्ला ते सायन किल्ला महामोर्चाचे आयोजन केले आहे. या महामोर्चाच्या माध्यमातून समस्त शिवभक्त आपला आवाज शासनदरबारी पोहचवणार असल्याचे रोहित देशपांडे मुंबई जिल्हा संपर्कप्रमुख यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
महाराष्ट्रातील ३५0 पेक्षा जास्त गड-किल्ल्यांची आजच्या घडीला मोठय़ा प्रमाणात पडझड झालेली आहे. सरकारी अनास्थेमुळे महाराष्ट्राची ही वैभवशाली ओळख नष्ट होत चालली आहे, असे सह्याद्री प्रतिष्ठानचे राहुल महाजन यांचे म्हणणे आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अरबी समुद्रात मोठय़ा दिमाखात उभे राहावे, अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष संजय सावंत यांनी केली आहे.गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी विविध ४0 मागण्यांचे पत्र महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांना दिले असतानाही यासाठी प्रतिसाद मिळू शकलेला नाही.
No comments:
Post a Comment