मुंबई: कामाच्या सततच्या ताणामुळे आयुष्यात आपल्याला इतर महत्त्वाच्या गोष्टींना वेळ देता येत नाही. आयुष्यात सभोवताली आणि वैयक्तिकरीत्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडत असताना वेळेअभावी त्यांत सहभागी होता येत नाही. त्यामुळे वेळेवरची आणि एकुणच आयुष्यावरची पकड निघुन गेल्याची भावना मनात निर्माण होते. या सर्व परिस्थितींवर मात करण्यासाठी नियोजनातून वेळेचा गुणाकार कसा करावा याविषयी मॅनेजमेंट गुरू संतोष नायर यांनी सुमारे ३००० उदयोन्मूख उद्योजकांना मार्गदर्शन केले.
‘वेळेचे नियोजन हे व्यक्तिश:, गटरूपाने, संस्थारूपाने अथवा देशरूपाने असाधारणरित्या करता येऊ शकते. वेळेचे स्वरूप पाहता वेळेला स्पर्शता, ऐकता किंवा त्याची चव घेता येत नाही. वेळेचे अस्तित्व आपल्याला वेळ नियोजित असल्यास आनंद व नियोजीत नसल्यास तणावरूपाने मान्य करावे लागते.’‘वेळ ही निसर्गाची निर्मीती असल्याकारणाने प्रत्येक गोष्ट ही क्रमाने घडते हे वेळेची जाण असलेल्याला ज्ञात असते. वेळ ही सतत, न थांबणारी, कुणासाठी कुणाचीही वाट न पाहणारी असते त्यामुळे वेळेचे नियोजन करणे ही एकप्रकारची कलाच आहे.’ असे संतोष नायर यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment