रोजंदारी आणि कंत्राटी कामगारांना पालिका सेवेत घेण्याचे आदेश
मुंबई - २० आणि २१ फेबु्रवारी रोजी होणार्या संपात पालिकेचे १ लाख ३० हजार कर्मचारी सहभागी होणार आहेत. संप काळात पालिकेची व्यवस्था हाताळण्यासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून रोजंदारी आणि कंत्राटी कामगारांना पालिका सेवेत घेण्याचे आदेश आयुक्त सीताराम कुंटे यांनी पालिकेच्या सर्व खातेप्रमुखांना बजावले आहे. आयुक्तांनी संपाबाबत काढलेल्या परिपत्रकात संपात सहभागी होणार्या कर्मचार्यांवर होणार्या कारवाईचा उल्लेख केलेला नाही. मात्र माध्यमांशी बोलताना कुंटे यांनी सारवासारव करत अत्यावश्यक सेवा कायदा (मेस्मा) अंतर्गत कर्मचार्यांवर कारवाई करण्याचे संकेत दिले.
कामगारांच्या संपाबाबत आयुक्त कुंटे यांनी संपकाळात घ्यावयाच्या खबरदारीबाबत परिपत्रक जारी केले असून त्यात २३ सूचना देण्यात आल्या आहेत. सहाय्यक आयुक्त, खातेप्रमुख आणि रुग्णालयप्रमुखांना या सूचना आणि आदेश पाळण्यास कुंटे यांनी कळविले आहे. अग्निशमन दलातील कर्मचारी संपात सहभागी झाले तर अग्निशमन अधिकार्यांना होमगार्डची व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रुग्णालये, अग्निशमन दल, पाणीपुरवठा, बेस्ट आणि मलनिस्सारण प्रचालन या अत्यावश्यक सेवांमधील कर्मचार्यांना त्या त्या खात्यात रात्रभर मुक्कामाला ठेवण्याचे आदेश कुंटे यांनी दिले आहेत. गरज म्हणून नायगाव पोलीस मुख्यालयातील पोलीस आणि होमगार्ड तैनात ठेवण्यात येणार आहेत. २० आणि २१ फेबु्रवारी रोजी कोणत्याही कामगारांना भरपगारी रजा, नैमित्तिक रजा, अर्धवेतनी रजा, विनावेतनी रजा देण्यात येऊ नये, असेही त्यांनी आदेश दिले आहे.
पालिकेच्या हेल्पलाइन२२६९४७२५, २२६९४७२७, १०८, २२६२०७५२ आणि २२६२१७४९
No comments:
Post a Comment