रायगड तालुक्यातील म्हसळा येथील कोकबळ गाव गेली ४० वर्षे पाण्यापासून वंचित आहे. कोकबळ गाव डोंगराळ विभागात असल्याने स्थानिक आमदार व मंत्री असलेल्या सुनील तटकरे यांनी त्यांच्या आमदार निधीमधून कोकबळच्या ग्रामस्थांसाठी विहीर बांधून गावातील पाणी प्रश्न त्वरित सोडवावा अशी मागणी कोकबळ बौद्धजन उन्नती मंडळाचे सरचिटणीस विनोद येलवे यांनी केली आहे.
तसेच म्हसळा ते सांगवड हा १ किलो मीटर रस्ता असून म्हसळा ते वान्डाबेकोंड इतकाच रस्ता पक्का स्वरूपाचा आहे. नेवरूळ ते सांगवड हा रस्ता कच्च्या स्वरूपाचा असून गेल्या १० वर्षात या रस्त्याचे दुरुस्तीकरण करण्यात आलेले नाही. यामुळे विद्यार्थी, गरोदर महिला तसेच वयोवृद्ध लोकांचे हाल होत असल्याने या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी विनोद येलवे यांनी केली आहे.
No comments:
Post a Comment