पालिकेचा २८ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर होणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 February 2013

पालिकेचा २८ हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर होणार


पेपरलेस काम, रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर
मुंबई / अजेयकुमार जाधव
मुंबई महानगर पालिका आयुक्त सुबोधकुमार यांनी गेल्या वर्षी विकासावर भर देणारा, व खर्चाना कात्री लावणारा अर्थसंकल्प सादर केला होता यावर्षी मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी नियोजित केलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी व पालिकेचा कारभार पेपरलेस करण्यासाठी मोठी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. २०१३-२०१४ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात रखडलेल्या पाणी प्रकल्पांवर जादा निधीची तरतूद करण्यात येणार आहे. सोमवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता स्थायी समिती समोर पालिका आयुक्त सीताराम कुंटे अर्थसंकल्प सादर करणार असून सुमारे २८ हजार कोटींचा हा अर्थसंकल्प असेल, अशी माहिती पालिका सूत्रांकडून दिली आहे.

पालिकेने २०१२ -१३ मध्ये २६ हजार ५८१ कोटींचा अर्थसंकल्प सादर केला होता. पालिका निवडणुकांमुळे तीन महिने उशिरा हा अर्थसंकल्प मंजूर झाला. गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पातील कामे सुरूच झाली नसल्याने ती रक्कम २०१३ - १४ च्या अर्थसंकल्पात वळवण्यात आली आहे. पालिकेने यंदा साडेपाच हजार कोटींपर्यंतची जकात वसुली झाल्याने पालिकेचा अर्थसंकल्प २८ हजार कोटींच्या घरात जाणार आहे. पालिकेचा कारभार पेपरलेस करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागांचे संगणकीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी आयटी विभागाचे मजबुतीकरण करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

जकातीमधून पालिकेला सर्वात जास्त महसुल मिळतो. पालिका क्षेत्रात जकाती ऐवजी स्थानिक स्वायत्त कर लागू होत असल्याने तो कर वगळून आर्थिक नियोजन करण्याची जबाबदारी पालिकेवर आहे. फ़नजिबल एफ. एस.आय. मुळे पालिकेला नवीन उत्पन्न स्त्रोत निर्माण झाले असून यामुळे पालिकेला गेल्या वर्षात दीड हजार कोटींचा महसूल अधिक मिळाला आहे. 

मागील अर्थसंकल्प  (कोटींमध्ये)
२००७-०८   १२,८७७.५२
२००८-०९    १६,८३१.५०
२००९-१०     १९,९३१.५४
२०१०-११     २०,४१७.३१
२०११-१२     २१,०९६.५६
२०१२-१३    २६,५८१.५६

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad