हिम्मत असेल तर २० तारखेचा संप यशस्वी करून दाखवा - शरद राव यांचे आव्हान - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 February 2013

हिम्मत असेल तर २० तारखेचा संप यशस्वी करून दाखवा - शरद राव यांचे आव्हान

संपामध्ये बेस्ट, पालिका, रिक्षा, ट्याक्सी, रुग्णालय चालू राहणार  

मुंबई / अजेयकुमार जाधव 

२१ फेब्रुवारीला १२ वी ची परीक्षा असल्याने त्या दिवशी संप करणार नाही असे आधीच जाहीर केले असताना. सोमवारी विविध संघटनांनी आझाद मैदान येथे घेतलेल्या सभेत शरद राव यांना पळकुटे म्हटले होते. यामुळे कामगार क्षेत्रात सर्वात जास्त सभासद असलेल्या हिंद मजदूर सभेचे कामगार नेते शरद राव यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेवून आम्ही फक्त औद्योगिक बंद मध्ये सहभागी होऊ इतर बंद मध्ये आम्ही सहभागी होणार नाही असे सांगत जर कोणामध्ये हिम्मत असेल तर २० तारखेचा संप यशस्वी करून दाखवाच असे आव्हान सेना व इतर  लाल बावटा संघटनांना दिले.

सोमवारच्या सभेत सेनेला व उद्धव ठाकरे यांना विशेष महत्व दिल्याने लाल बावटा संघटनांना राव यांनी यावेळी फैलावर घेतले. शरद राव प्रणीत युनिअनकडे सर्वात जास्त कामगार सभासद असल्याने काळ सोमवारच्या सभेवर याचा परिणाम जाणवला होता. आधी लॉंग मार्च मध्ये सहभागी होणारे शरद राव यांना उद्धव ठाकरे मोर्चाला संबोधित करणार असल्याचे समजल्याने राव यांनी लॉंग मार्च मध्ये सहभागी होणार नसल्याचे तसेच सभेमध्ये सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले होते. 

शरद राव यांच्या बेस्ट, पालिका, रिक्षा, ट्याक्सी अशा सर्वच क्षेत्रात युनिअन असून त्यांचे सभासद सुद्धा मोठ्या संखेने आहेत. यामुळे सोमवारच्या आझाद मैदान येथील सभेत लाल बावटा व शिवसेनेच्या अशा एकूण ३५ संघटनांचे फक्त ३ हजारच्या आस पास कामगार सहभागी झाले होते. २१ तारखेच्या संपात महाराष्ट्र राज्यात १२ वि ची परीक्षा असल्याने आधीच राव यांनी उतरणार नसल्याचे सांगितले असतानाच आज राव यांनी बेस्ट, पालिका, रिक्षा, ट्याक्सी, रुग्णालय यामधील कामगार संपामध्ये सहभागी होणार नाही असे स्पष्ट केल्याने मुंबई मध्ये आज बंद होणार नाही व सर्व सेवा सुरळीत चालू राहतील असे स्पष्ट झाले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad