रेल्वे अर्थसंकल्पात प्रवाशांना न्याय द्यावा - राम नाईक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 February 2013

रेल्वे अर्थसंकल्पात प्रवाशांना न्याय द्यावा - राम नाईक


मुंबई : मुंबईत रेल्वेने रोज ७२ लाख प्रवासी प्रवास करतात. त्यांचे प्रचंड हाल होतात. अशा अवस्थेतही रेल्वेमंत्री दरवाढ करत आहेत. मुंबईचे ५ खासदार लोकसभेत बोलत नाहीत. या प्रवाशांना आता वाली कोणीच उरला नसल्यामुळे रेल्वे अर्थसंकल्पात आता प्रवाशांना न्याय द्यावा, असे आवाहन माजी रेल्वेमंत्री राम नाईक यांनी शुक्रवारी पत्रकार संघ येथे केले.भाडेवाढ करू नये, सर्व लोकल १५ डब्यांच्या करा, चर्चगेट ते डहाणू लोकल थेट करावी. एमयूटीपीचे प्रकल्प त्वरित पूर्ण करावे, रेल्वेत ३५00 मृत्यू गेल्या वर्षी झाले. त्याबद्दल त्वरित उपाययोजना करा, वेळापत्रक योग्य प्रकारे राबवा, एलिवेटेड ट्रॅकची काही गरज नाही जर झालाच तर रेल्वे खर्च करणार का, खाजगी कंपन्या, हे अगोदर स्पष्ट करावे. याच मागण्यांचे निवेदन नाईक यांनी रेल्वेमंत्र्यांना दिले आहे.एक रेल्वे साडेतीन रेल्वेचे प्रवासी घेऊन धावतेय. जनावरे कोंबल्यासारखी माणसे रेल्वेत रोज प्रवास करत आहेत. याचा विचार रेल्वेमंत्र्यांनी करावा, असे सांगत नाईक म्हणाले, जनतेचा उद्रेक होण्याअगोदर त्यांना सोयी द्या; अन्यथा भविष्य फार भयानक आहे, असे नाईक यांनी सांगितले

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad