मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमधून गर्भवती महिलांच्या निदानाकरिता लागणारे हार्मोन्स टेस्ट करण्यासाठी लागणारे प्रेग्नन्सी किट्स उपलब्ध करण्यासाठी मनपाच्या शेड्युलमध्ये अंतभरूत करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी पालिका प्रशासनाला दिले.
मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये 'डायग्नोसिस' सेंटर (निदान केंद्राची) संख्या वाढवण्यात आली आहे. ही संख्या ३३ वरून ५२ आणि नंतर ८५ एवढी झाली आहे; परंतु पालिका रुग्णालयांत स्त्री रोग चिकित्सा विभागात तपासणीसाठी येणार्या महिलांना प्रेग्नन्सी किट्स उपलब्ध नसल्याने त्यांची योग्य ती तपासणी करता येत नाही. गर्भवती महिलांना प्राथमिक निदानासाठी लघवीतून हार्मोन्स टेस्ट करण्यासाठी लागणारे प्रेग्नन्सी किट्स उपलब्ध करण्यास पालिकेच्या अर्थसंकल्पात शेड्युलमध्ये यांचा समावेश करावा, अशी मागणी माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी स्थायी समिती सभेत केली.स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी त्या मागणीची त्वरित दखल घेत या वर्षीच्या अर्थसंकल्पात प्रेग्नन्सी किट्सचा शेड्युलमध्ये समावेश करण्याचे आदेश प्रशासनास दिले.
No comments:
Post a Comment