दलितांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 February 2013

दलितांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत - मुख्यमंत्री

राज्यात अल्पसंख्याक, दलित, आदिवासी यांच्यावर होणारे अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत. यासंदर्भात माहिती घेऊन कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा परखड इशारा मुख्यमंर्त्यांनी दिला. पुणे चाकण येथील कंपनीच्या उद्घाटनानंतर पत्रकारांनी साधलेल्या संवादामध्ये त्यांनी हा इशारा दिला.

यावेळी ते म्हणाले, एमआयडीसीतील रस्ते, वाहतूक, उद्योगांना सुरक्षा यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. राजगुरुनगर येथील विमानतळासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे मोशी येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार असून आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी संशोधन केंद्र सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा. 

केंद्राने राबविलेल्या शेतकर्‍यांच्या कर्जमाफी योजनेमुळे लाखो शेतकर्‍यांचे कर्ज माफ झाले आहे. यासाठी केंद्राने सुमारे 70 हजार कोटींचा बोजा स्वीकारला आहे. काही बँकांनी पुन्हा शेतकर्‍यांना कर्जवसुलीसाठी नोटीस पाठविलेली आहे. तसेच कॅगने दोष दाखविले आहेत. त्यामुळे यासंदर्भात माहिती घेण्यात येणार असून त्या योजनेत काही त्रुटी असतील तर त्या दूर केले जातील, असे आश्वासन मुख्यमंर्त्यांनी दिले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad