नैसर्गिक जलस्रोत विकसित करण्यावर भर- महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

25 February 2013

नैसर्गिक जलस्रोत विकसित करण्यावर भर- महापौर


मुंबई : मुंबई शहर व उपनगरात विहीर, तलावाच्या माध्यमातून अनेक नैसर्गिक जलस्रोत उपलब्ध आहेत. येत्या काळात पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन हे जलस्रोत विकसित करण्यावर मुंबई मनपा विशेष भर देणार असल्याचे प्रतिपादन महापौर सुनील प्रभू यांनी केले आहे. बोरिवली (प)येथील गावदेवी मंदिराजवळील पटांगणालगतच्या एक्सर तलावाच्या सुभोभिकरणाच्या कामाच्या भूमिपूजनाच्या वेळी ते बोलत होते. दोन स्थानिक आमदार डॉ. विनोद घोसाळकर आणि गोपाळ शेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन पार पडले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad