मुंबई : सार्वजनिक स्थळांवरील अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत हरकती, सूचना व निवेदने सादर करण्यास महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता 22 एपिल्र 2013 पर्यंत आता निवेदने सादर करता येणार आहेत.
मुंबई महापालिकेने रस्ते आणि फूटपाथवरील सार्वजनिक स्थळावरील अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी प्रसिद्ध करून हरकती व सूचना मागवल्या होत्या. या हरकती व सूचना महापालिकेत सादर करण्याची अंतिम तारीख 28 जानेवारी 2013 अशी होती. विविध संघटना व व्यक्तींनी निवेदने सादर करण्यास मुदतवाढ मिळावी यासाठी संबंधित विभागाकडे अर्ज सादर केले होते. त्यानुसार पालिका प्रशासनाने या प्रकरणी हरकती, निवेदन व सूचना सादर करण्याच्या कामी यापूर्वी 12 फेब्रुवारी 2013 पर्यंत मुदतवाढ केली होती. महापालिका आयुक्त सीताराम कुंटे यांनी विविध संघटना व व्यक्तींनी निवेदने सादर करण्यास पुन्हा एकदा मुदतवाढ दिली असून, 22 एपिल्र 2013 पर्यंत आता निवेदने सादर करता येतील, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Post Top Ad
17 February 2013
Home
Unlabelled
अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत निवेदन देण्यास मुदतवाढ
अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत निवेदन देण्यास मुदतवाढ
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post Bottom Ad
Author Details
'जेपीएन न्यूज' हे २०१२-१३ पासून मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. डिजीटल माध्यमाचा पूर्ण क्षमतेने वापर करून बातम्या, लेख, छायाचित्रे, व्हिडीओ आणि अन्य मजकूर 24 X 7 वेबसाईट्च्या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा 'जेपीएन न्यूज' चा प्रयत्न आहे.
No comments:
Post a Comment