हज यात्रेत शेकडो बोगस भक्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 February 2013

हज यात्रेत शेकडो बोगस भक्त

मुंबई : हज यात्रेसाठी जाणार्‍या खर्‍या भक्तांना शासनाने मदत करावी व काळ्या बाजाराने तिकीट घेणार्‍या बोगस भक्तांवर कठोर कारवाई करावी, तरच या यात्रेचा उद्देश सफल होईल, अशी मागणी मुव्हमेंट फॉर व्ह्युमन वेल्फेअर या संस्थेचे अध्यक्ष डॉ. अजीमउद्दीन यांनी केली. तसेच ही सर्व प्रक्रिया ऑनलाइन केली तर कोट्यावधीचा घोटाळा बाहेर येईल, अशी माहिती त्यांनी दिली. १ लाख २५ हजार हज कमिटीचे यात्रेकरू व ५५ हजार खाजगी पर्यटनामार्फत येणारे यात्रेकरू या व्यतिरिक्त जे गोरगरीब यात्रेकरू आहेत त्यांना हजला जाण्यासाठी शासनाने योग्य ती पारदर्शक यंत्रणा राबवावी, यासाठी संस्थेच्या वतीने जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. सौदी अरेबिया सरकार व भारत सरकार यांच्यात योग्य तो समन्वय नाही. त्यामुळे खाजगी पर्यटक संस्था व सरकारी अधिकारी यांच्या संगनमताने यात्रेकरू ड्रॉ पद्धतीने मनमानी कारभार होत आहे. आयुष्यात एकदाच हज यात्रेस परवानगी, असे सांगणार्‍या सरकारने या सर्व प्रक्रियेचा गांर्भीयाने विचार करत सर्वोच्च न्यायालयाला सरकारने खरी माहिती द्यावी, तरच खर्‍या हज यात्रेकरूंना हजला जाण्याची संधी मिळेल, असे डॉ. अजीमउद्दीन म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad