मुंबई : गेल्या काही दिवसांत पुन्हा उचल खाणार्या स्वाईन फ्ल्यूमुळे पालिका धास्तावली आहे. या पाश्र्वभूमीवर पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रयोगशाळा उघडण्यात येणार असल्याचे आरोग्य समितीच्या अध्यक्षा गीता गवळी यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांत मुंबईत स्वाईन फ्ल्यूचे 5 रुग्ण आढळले आहेत. मात्र प्रयोगशाळांच्या कमतरतेमुळे रुग्णांच्या चाचण्या होत नसल्याचे दिसून आले आहे. शहरात कस्तुरबा रुग्णालय आणि हाफकीन इन्स्टिटय़ूट येथे स्वाईन फ्ल्यूच्या प्रयोगशाळा आहेत. मात्र उपनगरात अद्यापही एक प्रयोगशाळा अस्तित्वात नाही. यापूर्वीच्या आरोग्य समितीच्या अध्यक्षांनी प्रशासनाकडे याबाबतची मागणी केली होती. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते, मात्र गवळी यांनी अध्यक्ष झाल्यापासून या प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे. उपनगरातील वाढत्या लोकसंख्येचा विचार करता नव्या दोन प्रयोगशाळांचा निर्णय घेण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment