बेस्ट कामगारांना आता एक खिडकी योजना - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

14 February 2013

बेस्ट कामगारांना आता एक खिडकी योजना

मुंबई : आजारपण व अपंगत्वामुळे अनेक बेस्ट वाहकांना पर्यायी हलके काम मिळावे म्हणून बेस्टने आता एक खिडकी योजना राबवण्याचे ठरवले आहे. पूर्वी सहा-सात विभागांत चकरा मारून असे कर्मचारी वैतागून जायचे. बेस्टच्या या निर्णयाने आता एकाच खिडकीत सर्व सोपस्कार पूर्ण करून पर्यायाची कामे मिळवता येणार आहे. बेस्टचे वैद्यकीय अधिकारी, वडाळय़ाचे नियोजन केंद्र, कर्मचारी नियंत्रण विभाग आदी विभागात चकरा मारून हे आजारी कर्मचारी वैतागून जायचे. येत्या सोमवारी महाव्यवस्थापक ओ. पी. गुप्ता यांच्या उपस्थित होणार्‍या बैठकीत या एक खिडकी योजनेबाबत आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामध्ये ४५० कामगारांना पर्यायी काम देण्याचे ठरवले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad