डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिल्या नंतर तमाम बौद्ध धाम्मियानी कर्मकांड नाकारले असताना हिंदुत्ववादी व जातीवादी पक्षांच्या दावणीला बांधलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे प्रमुख असलेले रामदास आठवले मुहूर्त बघून दिल्लीला मोर्चा घेवून जाणार आहेत.
मुंबई मराठी पत्रकार संघ येथे मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दलितांवरील वाढते अत्याचार रोखण्यास आणि महिलांचे संरक्षण करण्यास सरकार असमर्थ ठरल्याने काँग्रेस आघाडी सरकारचे तीन तेरा वाजवण्यासाठी १३ मार्च २०१३ रोजी १३ वाजता विविध १३ मागण्यांसाठी दिल्लीतील जंतर मंतर येथून संसदेवर मोर्चा काढणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment