कसाईवाडय़ात प्रसूतीगृह सुरू करा - महापौर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 February 2013

कसाईवाडय़ात प्रसूतीगृह सुरू करा - महापौर

मुंबई : कुर्ला (पू.) येथील कसाईवाडय़ातील आरोग्य केंद्राची महापौर सुनील प्रभू आणि शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सोमवारी संयुक्तपणे पाहणी केली. त्या वेळी स्थानिक नागरिकांच्या मागण्या लक्षात घेता आरोग्य केंद्रात प्रसूतीगृह सुरू करण्याची सूचना महापौरांनी आरोग्य अधिकार्‍यांना दिली.

कसाईवाडा येथे 2007मध्ये आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले होते. त्या ठिकाणी प्रसूतीगृह असताना ते सुरू करण्यासाठी तत्कालीन खा. मनोहर जोशी यांनी आपल्या खासदार निधीतून निधी दिल्याचे या वेळी महापौरांनी निदर्शनास आणून दिले, मात्र त्यानंतर या ठिकाणी अद्यापि प्रसूतीगृह सुरू झाले नसल्याने महापौरांनी चिंता व्यक्त केली. येथे आरोग्य केंद्रासोबतच प्रसूतीगृह सुरू करण्यासाठी जास्त चटईक्षेत्र वापरून ते सुरू करावे. तसेच इमारतींवर आणखी काही मजले वाढवता येऊ शकतात का, याबाबत महापौरांनी संबंधित अधिकार्‍यांना विचारणा केली आहे.मनपाच्या वास्तुशास्त्रज्ञांना या इमारतीची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशी सूचना या वेळी महापौरांनी केली आहे. या मुद्दय़ावर येत्या काळात अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांच्यासोबत महापौर दालनात बैठक घेणार असल्याचे या वेळी महापौरांनी सांगितले. कसाईवाडय़ातील लोकसंख्येच्या घनतेप्रमाणे पर्जन्य जलवाहिन्यांची निर्मिती करण्याची सूचना या वेळी महापौरांनी संबंधित अधिकार्‍यांना केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad