मुंबई / अजेयकुमार जाधव
नुकतीच अहमदनगर नेवासा येथे मराठा समाजातील तरुणीशी प्रेम केल्याने सचिन धारू, संदिप थनवर, आणि राहुल कन्दारे या तीन युवकांची निर्घुण हत्या करण्यात आली आहे.याप्रकरणामुळे राज्यामध्ये दलितांच्या वाढत्या हत्यांबाबत बोलताना दलितांच्या हत्या रोखण्यासाठी स्वतंत्र पोलिस यंत्रणा निर्माण करावी अशी मागणी रिपाइ आठवले गटाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.
दलितांच्या संरक्षणासाठी प्रत्येक जिल्यात एक अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक असावा, प्रत्येक पोलिस ठाण्यामध्ये १० पोलीसांची नेमणूक करावी अशी मागणी आठवले यांनी केली. नेवासा येथील तरुणांच्या कुटुंबियांना भेट दिल्या नंतर, पत्रकारांशी बोलताना प्रत्येक पिडीताच्या नातेवाईकाला ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.
यावेळी सदर हत्याकांडातील सर्व आरोपींना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी त्यासाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशा मागण्या आठवले यांनी केल्या. हा खटला नाशिक किवा जळगाव येथे चालवावा अशी मागणी करत मुख्यमंत्री निधीमधून पिडीताना १० लाख रुपये आर्थिक मदत म्हणून द्यावेत असे आवाहन आठवले यांनी केले.
No comments:
Post a Comment