86.10 कोटी शिलकीचा अर्थसंकल्प
|
सन 2013-14 करिता महसुली उत्पन्न 20,472.61 कोटी तर महसुली खर्च 18,123.16 कोटी इतके दर्शवण्यात आले आहे. भांडवली खर्च गेल्या वर्षीच्या तुलनेत थोडा जास्त असणार असून तो 9,369.41 कोटी असेल. पालिकेच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे स्नेत असणार्या जकातीमधून 7740 कोटी तर मालमत्ता कराच्या माध्यमातून 2259.66 कोटी उत्पन्नाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर विकास नियोजन खात्यापासून 3362.41 कोटींची प्राप्ती दर्शवण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या 3 जानेवारी 2013च्या पत्रान्वये प्राप्त निर्देशानुसार जकातीऐवजी स्थानिक संस्था कर (एलबीटी) लागू करण्यासाठी 1 ऑक्टोबर 2013 पासून प्रशासन प्रयत्न करणार आहे. यामुळे मुंबई शहराची बिझनेस फ्रेंडली म्हणून असलेली प्रतिमा आणखी उजळून व्यापारी आणि वाणिज्य संस्थांना दिलासा मिळेल, असे आयुक्तांकडून सांगण्यात आले.
मुंबईतील वाहतूक कोंडीवर उपाययोजनेसाठी समुद्रतट रस्ता प्रकल्प राबवण्यात येणार असून सल्लागाराच्या नेमणुकीसाठी विनंती प्रस्ताव मागवण्यात आले असल्याचे आयुक्तांनी सांगितले. पालिका 129 ठिकाणांवर वाहनतळांची सुविधा पुरवते. रहिवासी वाहनतळ परवाना, दिवसाचा वेळ आणि ठिकाण यानुसार वाहनतळासाठी वेगवेगळी आकारणी करणे अशा विशेष योजना राबवण्याच्या दृष्टीने दोन कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर 500 पेक्षा जास्त क्षमता असलेल्या प्रकल्पाला मंजुरी देण्याअगोदर अशा प्रकल्पामुळे वाहतुकीवर काय परिणाम होईल, याच्या अभ्यासासाठी 5 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
या अर्थसंकल्पामध्ये आरोग्यासाठी मलेरिया नियंत्रण कार्यक्रम, आरोग्य शिबिरे, दवाखान्यांची दजरेन्नती, प्रसूतीगृहांची दजरेन्नती, मधुमेह उपचार, मानसिक तणावासाठी हेल्पलाइन, क्षयरोग घट आणि नियंत्रणासाठी मुंबई आराखडा, डायग्नोस्टिक सेवा इत्यादींसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
शास्त्रोक्त पद्धतीने नागरी घनकचर्यावर प्रक्रिया करण्यासाठी 100.80 कोटींची तरतूद प्रस्तावण्यात आली आहे, तर 28,018 सफाई कामगारांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी 1800 कोटींची तरतूद केली आहे. मुंबईत अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, जाहिरातींचे फलक या चिंतेच्या बाबी असल्याचे आयुक्तांनी सांगितले. यासाठी काही अपवाद वगळता कोणत्याही जागी कोणत्याही प्रकारचे फलक लावण्यास मान्यता देण्यात येणार नसल्याचे सांगत हेरिटेज वास्तू होर्डिग्जमुक्त केल्या जातील, असे आयुक्तांनी सांगितले.
या वर्षी चेंबूर ते ट्रॉम्बे जलाशय हा 5.1 कि.मी. लांबीचा, तर चेंबूर-वडाळा-परळ हा 9 कि.मी.चा जलबोगदा प्रस्तावित असून हे दोन्ही बोगदे 6 वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी 82.38 कोटींची तरतूद प्रस्तावली असल्याचे आयुक्तांनी सांगितले.पालिकेच्या दस्ताऐवजांचे स्कॅनिंग
मंत्रालयातील आगीचा बोध घेऊन कोणत्याही दुर्घटनेपासून अभिलेख संरक्षित करणे आणि तो आवश्यकतेनुसार उपलब्ध व्हावा, यासाठी 80 कोटी दस्ताऐवज स्कॅन करण्यात येणार आहेत. माहितीच्या अधिकारांतर्गतच्या आवश्यकतेनुसार हे स्कॅन झालेले अभिलेख पालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील.
पालिका अधिकार्यांची मालमत्ता विवरणपत्रे जनतेसाठी खुली
पालिकेतील भ्रष्टाचाराबाबत नेहमीच सर्वसामान्यांमध्ये चर्चा असते. त्यामुळे पालिकेतील वरिष्ठ अधिकार्यांच्या वैयक्तिक वागणुकीमध्ये जबाबदारपणा आणि पारदर्शकता आणण्याकरिता पालिका अधिकार्यांची वार्षिक मालमत्ता विवरणपत्रे सामान्य जनतेसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
हायटेक पालिकेचा जनतेशी थेट संवाद
'महापालिका वृत्त' हे विविध योजनांसह तपशील देण्याकरिता 'स्टेट ऑफ द आर्ट' सुविधा असलेले पालिकेचे बातम्या देणारे संकेतस्थळ सुरू करणार. त्याचप्रमाणे सर्वसामान्यांशी थेट संवाद साधण्यासाठी संकेतस्थळावरील फेसबुक, ट्विटर आणि ब्लॉग्ज इत्यादी माध्यमांचाही फायदा करून घेणार.
पालिकेच्या रस्त्यांखाली सुमारे 28 बाह्य यंत्रणांनी आपल्या उपयोगिता सेवांच्या केबल्स टाकल्या आहेत, मात्र त्यामुळे वारंवार रस्ते उखडले जातात. हे रोखण्यासाठी जगभर स्वीकारलेल्या 'कोऑर्डिनेटेड प्लेसमेंट ऑफ युटिलिटीज' या प्रणालीचा उपयोग करून खोदण्याचे प्रमाण कमी करण्यात येणार आहे.
डांबरी रस्ते - 877.51 कोटी
सिमेंट-काँक्रीटचे रस्ते - 770.03 कोटी
वाहतूक प्रचालन - 33.40 कोटी
पूल - 320.12 कोटी
सर्व उदंचन केंद्रांच्या कामांसाठी : 171 कोटी
ब्रिमस्टोवॅड प्रकल्पासाठी : 671.02 कोटी
ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाव्यतिरिक्त कामांसाठी : 443.60 कोटी
मिठी नदी व इतर नद्यांचे रुंदीकरण नालाप्रणाली तसेच संरक्षक भिंतीसाठी : 45 कोटी
पर्जन्य जलवाहिन्यांच्या भांडवली खर्चासाठी : 1114.62 कोटी
अग्निशमन सामग्रीसाठी : 53.27 कोटी
देवनार पशुवधगृहाचे आधुनिकीकरण : 15 कोटी
मंडयांच्या दुरुस्त्या, पुनर्बाधकामासाठी : 61.49 कोटी
नाटय़गृहे व क्रीडा संकुले दुरुस्त्या, पुनर्बाधणी : 15.50 कोटी
जलबोगद्यांसाठी : 1069 कोटी
तानसा जलवाहिनीसाठी : 350 कोटी
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी : 57 कोटी
जल वितरण सुधारणा कार्यक्रमासाठी : 40.50 कोटी
कृत्रिम पावसाच्या अभ्यासासाठी : 5 कोटीविशेष तरतूद
ब्रिमस्टोवॅड प्रकल्पासाठी : 671.02 कोटी
ब्रिमस्टोवॅड प्रकल्पाव्यतिरिक्त कामांसाठी : 443.60 कोटी
मिठी नदी व इतर नद्यांचे रुंदीकरण नालाप्रणाली तसेच संरक्षक भिंतीसाठी : 45 कोटी
पर्जन्य जलवाहिन्यांच्या भांडवली खर्चासाठी : 1114.62 कोटी
अग्निशमन सामग्रीसाठी : 53.27 कोटी
देवनार पशुवधगृहाचे आधुनिकीकरण : 15 कोटी
मंडयांच्या दुरुस्त्या, पुनर्बाधकामासाठी : 61.49 कोटी
नाटय़गृहे व क्रीडा संकुले दुरुस्त्या, पुनर्बाधणी : 15.50 कोटी
जलबोगद्यांसाठी : 1069 कोटी
तानसा जलवाहिनीसाठी : 350 कोटी
पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी : 57 कोटी
जल वितरण सुधारणा कार्यक्रमासाठी : 40.50 कोटी
कृत्रिम पावसाच्या अभ्यासासाठी : 5 कोटीविशेष तरतूद
No comments:
Post a Comment