महात्मा गांधी पथक्रांती योजनेंतर्गत 2643 झोपडीधारकांचे पुनर्वसन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

09 February 2013

महात्मा गांधी पथक्रांती योजनेंतर्गत 2643 झोपडीधारकांचे पुनर्वसन

मुंबई : मुंबईतील पदपथ, रस्त्यावरील 1995 पूर्वीच्या झोपडीधारकांसाठी राबवण्यात आलेल्या महात्मा गांधी पथक्रांती योजनेनुसार पहिल्या टप्प्यात 20 रस्त्यांची निवड करून झोपडय़ांचे सर्वेक्षण, निष्कासन पुनर्वसन आणि सुशोभिकरणाचा कालबाह्य कार्यक्रम हाती घेत त्यानुसार 5441 झोपडय़ांचे निष्कासन करून 2643 पात्र झोपडीधारकांचे पुनर्वसन करण्यात आले असल्याचे उपायुक्त राजेंद्र भोसले यांनी सांगितले.

दुसर्‍या टप्प्यांमध्ये मुंबईतील 125 रस्त्यांचे काम प्राधान्याने हाती घेण्यात आले असून त्यामध्ये सुमारे 6417 झोपडय़ा आहेत. जानेवारी 2013 पर्यंत 52 रस्त्यांवरील/पदपथांवरील झोपडय़ांचे सर्वेक्षण, निष्कासनपात्र झोपडीधारकांचे पुनर्वसनाचे, सुशोभिकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. उर्वरित रस्त्यावरील झोपडीधारकांच्या सर्वेक्षणाचे व पात्रता निश्चित करण्याचे काम पूर्ण झाले असून पर्यायी सदनिकांची व्यवस्था झाल्यानंतर झोपडय़ांचे निष्कासन व पुनर्वसनाचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले. पात्र झोपडीधारकांच्या पुनर्वसनासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून 2416 सदनिका प्राप्त झाल्या असून पात्र झोपडीधारकांच्या स्थलांतराची कार्यवाही मे 2013 पर्यंत करण्यात येणार असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad