मुंबई :मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाचा सन 2013-14 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त मोहन अडताणी यांनी सोमवारी शिक्षण समिती सभेत शिक्षण समिती अध्यक्ष विठ्ठल खरटमोल यांच्याकडे सादर केला. हा अर्थसंकल्प 2472.53 कोटी रुपयांचा असून 20.28 कोटी रुपये शिलकीचा आहे.
या अर्थसंकल्पात 2115.45 कोटींचे महसुली उत्पन्न दाखवले असून 357.08 कोटी भांडवली प्राप्ती असणार आहे तर महसुली खर्च 2115.45 कोटी असून भांडवली खर्च 356.98 कोटी रुपये दाखवण्यात आला आहे. महसुली व खर्चाच्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये सन 2012-13 या वर्षाच्या तुलनेत 139.83 कोटींची वाढीव तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.
सन 2013-14च्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात शैक्षणिक पायाभूत सुविधांसाठी 358.86 कोटींची तर विद्यार्थ्यांच्या कल्याणकारी योजनेसाठी 640.35 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. पालिका शाळांची शैक्षणिक गुणवत्ता व दर्जा सुधारण्यासंबंधी काही महत्त्वाच्या योजना व उपक्रम आणण्यात आले असून यामध्ये प्रामुख्याने व्हच्यरुअल क्लासरूम, सर्व शाळा संगणक व इंटरनेटद्वारे जोडणे, शालेय इमारतींची दुरुस्ती, दजरेन्नती व पुनर्बाधणी, शाळांचे दर्जेदार हाऊसकीपिंग, गुणवत्ता वाढ प्रकल्प, शाळेतील वाचनालये, प्राथमिक शिक्षण प्रशिक्षण केंद्रे, शुद्ध पाणीपुरवठा, विद्यार्थ्यांसाठी बेंच व डेस्क, सार्वजनिक ग्रंथालयासाठी अनुदान तसेच विद्यार्थिनींना स्वरक्षणाचे प्रशिक्षण यांचा समावेश आहे.
या अर्थसंकल्पात महानगरपालिका शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध कल्याणकारी योजना आखण्यात आल्या असून यामध्ये मोफत पाठय़पुस्तके, सुगंधी दूध पुरवठा, शैक्षणिक वस्तू, शालेय पोषण आहार, रस्त्यावरील मुलांसाठी वसतिगृहासह शाळा, शालेय आरोग्य कार्यक्रम, विद्यार्थिनींसाठी उपस्थिती भत्ता, विद्यार्थ्यांसाठी बस भाडे, शिष्यवृत्ती परीक्षा, राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, तसेच व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती, बालवाडय़ांना अनुदान, खाजगी प्राथमिक अनुदानित शाळांना अनुदान इत्यादी योजनांचा समावेश आहे.
योजनांसाठी तरतूद
शैक्षणिक साहित्य : 97.41 कोटी
सुगंधित दूध पुरवठा : 132.01 कोटी
रस्त्यावरील मुलांसाठी वसतिगृह शाळा : 60 लाख
विद्यार्थिनींसाठी उपस्थिती भत्ता : 6.27 कोटी
विद्यार्थासाठी बस भाडे : 21 लाख
शिष्यवृत्ती परीक्षा : 7.10 कोटी
उच्च शिक्षण शिष्यवृत्ती : 1.20 कोटी
व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रम
शिष्यवृत्ती : 2.40 कोटी
शालेय अनुदान : 353.26 कोटी
बालवाडय़ा अनुदान : 1.80 कोटी
शालेय आरोग्य अभियान कार्यक्रम : 20 लाख
निवृत्ती वेतन अधिदान : 37 कोटी
पायाभूत सुविधांसाठी तरतूद
व्हच्यरुअल क्लासरूम : 26.50 कोटी
शाळांची संगणक जोडणी : 5.03 कोटी
शाळा दुरुस्तीसाठी : 262.23 कोटी
हाऊसकीपिंग : 37.29 कोटी
गुणवत्ता वाढ प्रकल्प : 15.65 कोटी
शाळेतील वाचनालये : 3.88 कोटी
प्राथमिक शिक्षण प्रशिक्षण केंद्र : 4.50 कोटी
शुद्ध पाणीपुरवठा : 2.19 कोटी
बेंच व डेस्क : 1.05 कोटी
एशियाटिक लायब्ररीसाठी अनुदान : 25 लाख
शैक्षणिक साहित्य : 97.41 कोटी
सुगंधित दूध पुरवठा : 132.01 कोटी
रस्त्यावरील मुलांसाठी वसतिगृह शाळा : 60 लाख
विद्यार्थिनींसाठी उपस्थिती भत्ता : 6.27 कोटी
विद्यार्थासाठी बस भाडे : 21 लाख
शिष्यवृत्ती परीक्षा : 7.10 कोटी
उच्च शिक्षण शिष्यवृत्ती : 1.20 कोटी
व्यावसायिक व तांत्रिक अभ्यासक्रम
शिष्यवृत्ती : 2.40 कोटी
शालेय अनुदान : 353.26 कोटी
बालवाडय़ा अनुदान : 1.80 कोटी
शालेय आरोग्य अभियान कार्यक्रम : 20 लाख
निवृत्ती वेतन अधिदान : 37 कोटी
पायाभूत सुविधांसाठी तरतूद
व्हच्यरुअल क्लासरूम : 26.50 कोटी
शाळांची संगणक जोडणी : 5.03 कोटी
शाळा दुरुस्तीसाठी : 262.23 कोटी
हाऊसकीपिंग : 37.29 कोटी
गुणवत्ता वाढ प्रकल्प : 15.65 कोटी
शाळेतील वाचनालये : 3.88 कोटी
प्राथमिक शिक्षण प्रशिक्षण केंद्र : 4.50 कोटी
शुद्ध पाणीपुरवठा : 2.19 कोटी
बेंच व डेस्क : 1.05 कोटी
एशियाटिक लायब्ररीसाठी अनुदान : 25 लाख
No comments:
Post a Comment