राज्यातील 130 पक्षांनी वार्षिक जमाखर्च सादर केलेला नाही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

06 February 2013

राज्यातील 130 पक्षांनी वार्षिक जमाखर्च सादर केलेला नाही


मुंबई - राज्य निवडणूक आयोगाने आदेश देऊनही राज्यातील  130 राजकीय पक्षांनी अद्याप जमाखर्चाची वार्षिक विवरणपत्रे सादर केलेली नाहीत. त्यामुळे या पक्षांवर कारवाई होण्याची चिन्हे आहेत. सर्व पक्षांनी आपली विवरण पत्रे सादर करावीत, असा अंतिम आदेश देणारी कायदेशीर नोटीस निवडणूक आयोगाकडून पुढील आठवड्यात पाठविण्यात येणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत  320 राजकीय पक्षांची नोंदणी झालेली आहे. या सर्वच पक्षांनी दर वर्षी आयकर भरल्याचे विवरण पत्र निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे. मात्र आतापर्यंत कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया या एकमेव पक्षाने आवश्यक माहिती सादर केल्याची नोंद आयोगाकडे आहे. उर्वरित 191 पक्षांनी त्यांच्या आयकर विवरण पत्राची प्रत आयोगाला दिलेली नाही. यासाठी राज्यातील काँग्रेस, राष्‍ट्र वादी कॉँग्रेस, भाजप, मनसे, शिवसेनेसह 191 राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने आॅक्टोबर 2012 मध्ये नोटिसा बजावल्या होत्या. त्यानंतर केवळ 61 पक्षांनीच ही माहिती सादर केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad