मानवकल्याणासाठी काम करणाऱ्या "अझीम प्रेमजी फाउंडेशन' या संस्थेकडे "विप्रो' कंपनीचे 29.5 कोटी शेअर्स (बाजारातील मूल्य 12 हजार 300 कोटी रुपये) हस्तांतरित करण्याचा निर्णय उद्योजक अझीम प्रेमजी यांनी घेतला आहे.
"अझीम प्रेमजी फाउंडेशन' करीत असलेल्या वेगवेगळ्या सामाजिक कामांवर हे 12 हजार 300 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. येत्या पाच वर्षांत हा निधी खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. "विप्रो'च्या भांडवलातील वाट्यानुसार अझीम प्रेमजी यांची वैयक्तिक संपत्ती 15 अब्ज डॉलर इतकी आहे. प्रेमजींकडे कंपनीतील 78.29 टक्के भांडवल आहे.
ट्रस्टकडे हस्तांतरित करण्यात आलेले शेअर "विप्रो' कंपनीच्या एकूण भांडवालापैकी 12 टक्के इतके आहेत. त्यामुळे "विप्रो' कंपनीतील अझीम प्रेमजी ट्रस्टच्या शेअरचा वाटा 19.93 टक्क्यांपर्यंत जाणार आहे.
देशातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा सुधारावा आणि अधिकाधिक मुलांना त्याचा लाभ घेता यावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अझीम प्रेमजी यांनी 19 फेब्रुवारीला सांगितले होते. यापूर्वी 2010 मध्ये प्रेमजी यांनी "विप्रो' कंपतीनील 8.7 टक्के शेअर्स सामाजिक उपक्रमांसाठी दिले आहेत.
No comments:
Post a Comment