डी.एड़, सीईटी २0१0 विद्यार्थी कृती समितीचे उपोषण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 February 2013

डी.एड़, सीईटी २0१0 विद्यार्थी कृती समितीचे उपोषण


मुंबई : डी.एड़, सीईटी मे २0१0 च्या पुनर्मूल्यांकनातील शिफारशीस पात्र उमेदवारांना त्वरित शिक्षण सेवकपदी नियुक्ती मिळावी यासाठी पुनर्मूल्यांकन विद्यार्थी कृती समितीच्या वतीने आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनाचा निकाल जाहीर केल्यानंतर निकालाच्या प्रतीमध्ये शिफारशीस पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना रिक्तपदाच्या उपलब्धतेनुसार शासकीय आदेशानुसार नियुक्ती देण्यात येईल, असे नमूद करूनही एकाही विद्यार्थ्यास नियुक्ती दिलेली नाही, म्हणून आम्ही आमरण उपोषणाचा निर्णय घेतल्याचे समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज वाघाडे यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad