नवी दिल्ली : वर्षानुवर्षे शेती उत्पन्नात येणारी घट आणि त्यामुळे निर्माण झालेली वैफल्यग्रस्त परिस्थिती हीच शेतकर्यांच्या आत्महत्येची मूळ कारणे आहेत, अशी कबुली देत गेल्या दहा महिन्यांत विदर्भातील २२८ शेतकर्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज्यसभेत दिली.
यासंदर्भात खासदार राजकुमार धूत यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्या प्रश्नावर पवार यांनी वरील उत्तर दिले. शेतकर्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून सरकार विविध योजना राबवून त्या योजनांची अंमलबजावणी कृषी विभागाकडून नियोजनबद्धरीत्या केली जाते. या योजनांचा लाभ अनेक शेतकर्यांना मिळालेला आहे, मात्र पावसाचा लहरीपणा आणि त्यामुळे निर्माण होणार्या पाण्याच्या प्रश्नामुळे शेती व्यवसाय धोक्यात येत आहे. शेतीतून समाधानकारक उत्पन्न होत नसल्याने शेतकरी कर्जबाजारी होतात. त्यामुळे त्यांच्यात निराशेचे वातावरण निर्माण होते. याच कारणामुळे शेतकरी आत्महत्येचा मार्ग स्वीकारतो, मात्र हा मार्ग चुकीचा असल्याचे या वेळी कृषीमंत्री पवार यांनी सांगितले.
२0१२-२0१३ या आर्थिक वर्षात ३१ जानेवारीपर्यंत म्हणजेच गेल्या दहा महिन्यांत विदर्भातील २२८ शेतकर्यांनी आत्महत्या केल्याची माहिती महाराष्ट्र सरकारने दिल्याचे कृषीमंत्र्यांनी या वेळी सांगितले. २00६ मध्ये विदर्भातील १ हजार ३५ शेतकर्यांनी आत्महत्या केली होती. त्यात २0११ मध्ये घट होऊन ४८५ झाली होती. २00६ मध्ये ५६५ शेतकर्यांनी आत्महत्या केली असल्याचे देखील या वेळी कृषीमंत्र्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment