दि:२०/१/२०१२ रशीद इनामदार
सरकारने बालमजूर कामावर ठेवणे कायदेशीर गुन्हा आहे असे जाहीर करून देखील . बरयाच ठिकाणी आज हि सरकारी नियम धाब्यावर बसवून बालमजुरांना कामावर ठेवल्याचे दिसून येत आहे . बालमजुरा संधर्भात कडक कायदा आहे तसाच तंबाखू ,गुटखा यासारखे पदार्थ १८ वर्षाखालील मुलांना विकणे किंवा हाताळायला देणे हा गुन्हा आहे. हे दोन्ही नियम धाब्यावर बसवून वीरमाता जिजाबाई भोसले मार्गावरील मानखुर्द पासून जवळ असलेल्या एकतानगर मधील रामलिंगम बार मध्ये अल्पवयीन मुलाला वेटर म्हणून कामाला ठेवल्याचा धक्कादायक प्रकार निदर्शनास आला आहे. शालेय वयात चांगले विचार मुलांवर बिम्ब्वण्याच्या वयात हि अशी बार मध्ये वेटर म्हणून पोट भरण्याची वेळ आली आहे . यामुळे बऱ्याच नागरिकांनी याबद्दल चिंता व्यक्त केली आहे आहे. तसेच बार मध्ये मद्य पिण्यास येणाऱ्या मद्य प्यानी हि विचारणा केली परंतु त्यानाही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. हा प्रकार लक्षात येऊ नये यासाठी मजुरांन आलटून पालटून कामावर बोलवण्याची शक्कल लढवली आहे .
No comments:
Post a Comment