मुंबई : मुंबई मनपा प्रशासनाने खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित प्राथमिक शाळासंहितेच्या सादर केलेल्या सुधारित प्रस्तावातील जाचक अटींमुळे अनेक मराठी माध्यमांच्या शाळांचे अस्तित्व धोक्यात येणार आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने प्रस्तावित केलेली सुधारित शाळासंहिता दफ्तरी दाखल होईल; पण मराठी शाळा बंद पडू देणर नाही, असे प्रतिपादन महापौर सुनील प्रभू यांनी केले आहे.
मुळातच मुंबईमध्ये मराठी शाळा बंद पडल्याचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. या प्रस्तावामुळे या शाळा पूर्णपणे बंद पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपण या सुधारित शाळासंहितेला विरोध असल्याचे महापौरांचे म्हणणे आहे. या प्रस्तावात महानगरपालिका प्रशासनाने असे नमूद केले आहे की, प्रस्तावित सुधारणा खाजगी प्राथमिक शाळासंहितेत समाविष्ट करताना काही नियमांबाबत त्याची अंमलबजावणी केल्यास प्राथमिक शाळांसाठी लागू असलेल्या निकषांना बाधा येणार आहे. त्यामुळेच हा प्रस्ताव दफ्तरी दाखल करण्याची आवश्यकता असल्याचे महापौर सुनील प्रभू यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment