परशुरामाची प्रतिमा काढली, संभाजी ब्रिगेडचा बहिष्कार मागे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

11 January 2013

परशुरामाची प्रतिमा काढली, संभाजी ब्रिगेडचा बहिष्कार मागे

चर्चेत असलेल्या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेवरील परशुरामाची प्रतिमा आणि परशु काढल्याने संमेलनात कोणताही अडथळा करणार नसल्याचे संभाजी ब्रिगेडने गुरुवारी जाहीर केले.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नव्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या असून ,त्यावरील परशुरामाची प्रतिमा आणि परशु काढल्याने संमेलनात कोणताही अडथळा करणार नसल्याचेसंभाजी ब्रिगेडने गुरुवारी जाहीर केले त्यामुळे परशुरामाच्या प्रतिमेवरून निर्माण झालेल्या वादावरपडदा पडला आहे 

संमेलनस्थळी आपले कार्यकर्ते जाणार नसल्याचेही संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले याबाबतसंमेलनाध्यक्ष डॉ नागनाथ कोतापल्ले यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती ब्रिगेडचे प्रदेश कार्याध्यक्षशांताराम कुंजीर यांनी दिली संमेलनस्थळी जिजाऊ श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे तैलचित्रलावण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले छावा संघटनेनीही या निर्णयाचे स्वागतकेले असून संमेलन पार पाडण्यास सहकार्य करू असे संघटनेचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटीलयांनी म्हटले आहे 

दरम्यान निमंत्रणपत्रिकेची तिसरी आवृत्ती काढण्यात आली असून त्याच्या १२ हजार प्रती छापल्याआहेत यामध्ये परशु आ ​ णि परशुरामाचे चित्रही काढून टाकण्यात आले आहे मात्र आम्हीपत्रिका मागे घेतलेली नाही तर नवीन पत्रिका काढली आहे एवढेच पत्रिकेवर एखादे चित्र आहे कीनाही याला महत्त्वच नाही मुळातच आता हा वाद संपवूया आणि कार्यक्रम नीट पार पाडूया ,अशी भूमिका कार्याध्यक्ष प्रकाश देशपांडे यांनी मांडली आहे तसेच त्यांनी संभाजी ब्रिगेडलाहीधन्यवाद दिले असून त्यांना संमेलनाचे आमंत्रण दिले आहे 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad