औद्योगिक कर्मचार्‍यांचा दोनदिवसीय संप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 January 2013

औद्योगिक कर्मचार्‍यांचा दोनदिवसीय संप

संपूर्ण देशभरातील औद्योगिक कर्मचारी विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी 20 फेब्रुवारीपासून दोनदिवसीय संपावर जाणार आहेत. विविध औद्योगिक समूहांतील कर्मचारी या संपात सामील होतील, अशी माहिती 'स्टील मेटल अँण्ड इंजिनीअरिंग वर्कर्स फेडरेशन ऑफ इंडिया'चे सरचिटणीस संजय वाधवकर यांनी बुधवारी दिली. कर्मचार्‍यांना दर महिन्याला 10 हजार रुपये इतके किमान वेतन देण्यात यावे, ही आपली प्रमुख मागणी असल्याचे त्यांनी सांगितले. मागण्यांच्या पूर्ततेसाठी दोनदिवसीय संपाबरोबरच ठाण्यात 23 व 24 फेब्रुवारी रोजी व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींची राष्ट्रीय बैठकही बोलावण्यात आली आहे. या बैठकीत कर्मचार्‍यांच्या मागण्यांविषयीच चर्चा होणार असल्याचे वाधवकर यांनी स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad