अल्पसंख्य नागरिकांवरील वाढते अत्याचार देशासाठी लाजिरवाणे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 January 2013

अल्पसंख्य नागरिकांवरील वाढते अत्याचार देशासाठी लाजिरवाणे


भारत एकीकडे ६४ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना दुसरीकडे अल्पसंख्य नागरिकांवरील वाढते अत्याचार देशासाठी लाजिरवाणे असल्याचे मत महात्मा गांधींचे नातू तुषार गांधी यांनी व्यक्त केले.

देशात ख्रिस्ती समाजावरील अत्याचाराच्या पार्श्‍वभूमीवर इंडियन ख्रिश्‍चन व्हॉईसचे अध्यक्ष डॉ. अब्राहम मथानी यांनी तयार केलेल्या वार्षिक छळवणूक अहवालाचे प्रकाशन तुषार गांधी आणि मौलाना मुस्तकीन आझमी यांच्या उपस्थितीत मुंबई मराठी पत्रकार संघात झाले. यावेळी गांधी म्हणाले की, भारतीय जनतेच्या उदासीन भूमिकेमुळेच अत्याचारात वाढ होत आहे. आझमी यांनीही अशा अत्याचाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला. ते म्हणाले, अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार देशाला नवीन नाहीत. देशाच्या फाळणीमागचे कारणही काही मोजक्या लोकांची खेळी असल्याचा आरोप आझमी यांनी केला. 

राज्यात मोखाडा, पालघर आदी ठिकाणी ख्रिश्‍चन समाजावर होणार्‍या अत्याचाराकडे पोलीस दुर्लक्ष करत आहेत. पोलिसांची कारवाई संशयास्पद असून पोलीस जातीयवाद्यांना मदत करत असल्याचा आरोप डॉ. अब्राहम मथानी यांनी केला आहे. देशभरातील अत्याचार थांबविण्यासाठी कडक कायद्याची गरज असल्याचे मत मथानी यांनी व्यक्त केले.

१८ राज्यांमधील गेल्या वर्षभरात घडलेले अत्याचार
कर्नाटक ३७
छत्तीसगढ २१
मध्य प्रदेश १८
आंध्र प्रदेश १३
तामिळनाडू ११
आसाम 0५
महाराष्ट्र 0५ 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad