महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सुबोध कुमार यांच्या निर्देशानुसार ऑगस्ट २०११ साली आधार कार्ड काढणे कर्मचार्यांना सक्तीचे करण्यात आले. आधार कार्ड नसल्यास कर्मचार्यांना पगार मिळणार नाही असेही बजावण्यात आले होते. कर्मचार्यांनी ही बाब गांभीर्याने घेतली नाही. महापालिकेने मुख्यालयात कर्मचार्यांसाठी आधार कार्डसाठी खास केंद्र सुरू केले. मात्र त्यानंतरही महापालिकेच्या कर्मचार्यांनी आधार कार्ड काढले नाही. ऑगस्ट २०१२ ची मुदत उलटल्यानंतर त्यानंतरही कर्मचार्यांच्या विनंतीनुसार ही मुदत नोव्हेंबर २०१२ पर्यंत वाढविण्यात आली होती, महापालिकेच्या १ लाख ११ हजार कर्मचार्यांपैकी २०,८०० कर्मचार्यांनी आधार कार्ड काढलेले नाही.
आधार कार्ड नसले तरी या कर्मचार्यांनी आधार कार्ड नोंदणीनंतर मिळणारी स्लिप दाखविली तरी कर्मचार्यांना पगार मिळणार आहे. असे प्रमुख लेखापाल नंदकुमार राणे यांनी सांगितले.दरम्यान आधार कार्ड नसल्यास त्याचा फटका महापालिकेच्या पेन्शनर्सनाही बसणार आहे. आधार क्रमांक न देणार्या पेन्शनर्सचे पेन्शनही डिसेंबर महिन्यापासून रोखण्यात येणार आहे असल्याचे समजते.
No comments:
Post a Comment