संघावर बंदी घालण्यात यावी आणि भाजपची मान्यता रद्द करावी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 January 2013

संघावर बंदी घालण्यात यावी आणि भाजपची मान्यता रद्द करावी

मुंबई- भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ दहशतवादी कारवायांचे शिक्षण देत असल्याच्या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या संघटनांचा खरा चेहरा उघड झाला आहे. त्यामुळे संघावर बंदी घालण्यात यावी आणि भाजपची मान्यता रद्द करावी, तसेच संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांना तत्काळ तुरुंगात टाकण्यात यावे, या मागण्या "भारत बचाओ आंदोलन'च्या पदाधिकाऱ्यांनी आज पत्रकार परिषदेत केल्या. 

तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी नांदेड, मालेगाव येथील, तसेच "समझौता एक्‍स्प्रेस'मध्ये झालेल्या स्फोटांचे धागेदोरे शोधून काढले होते. या स्फोटांप्रकरणी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहित या हिंदुत्ववादी नेत्यांना अटक केली होती, याची आठवणही या वेळी उपस्थितांनी करून दिली. या वेळी किशोर जगताप, फिरोज मिठीबोरवाला आदी उपस्थित होते.

सुशीलकुमार शिंदे यांनी सत्य सांगण्याचे धाडस दाखविले आहे. आता त्यांनी या संघटनांवर कारवाई करण्याचेही धैर्य दाखवावे, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad