संयुक्त महाराष्ट्र दुर्मिळ छायचित्रांचे प्रदर्शन - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 January 2013

संयुक्त महाराष्ट्र दुर्मिळ छायचित्रांचे प्रदर्शन


मुंबई : संयक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी आणि लढय़ातील स्वातंर्त्यसैनिकांच्या स्मृती चिरंतन जपण्यासाठी संयुक्तमहाराष्ट्र लढय़ातील दुर्मिळ छायचित्रांचे प्रदर्शन महापालिकेच्या प्रत्येक शाळेत भरवण्यात यावे, अशी सूचना महापौर सुनील प्रभू यांनी केली आहे.

संयुक्त महाराष्ट्र लढय़ातील दुर्मिळ छायचित्रांचे प्रदर्शन 21 ते 24 जानेवारीदरम्यान मनपा क्रीडा भवनात आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन महापौरांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. महापालिका शाळांमध्ये प्रदर्शनासोबतच संयुक्त महाराष्ट्र लढय़ाची चित्रफीतसुद्धा दाखवण्याची व्यवस्था करावी. तसेच महापालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये प्रदर्शन भरवण्याची व्यवस्था करावी, अशी सूचना या वेळी महापौरांनी पालिका प्रशासनाला केली. या वेळी उपमहापौर मोहन मिठबावकर, संग्रहालय निर्माण समितीचे सदस्य पंढरीनाथ सावंत आदी पालिकेतील अधिकारी वर्ग या वेळी उपस्थित होता.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad